नागपूर : नागपूरमध्ये भाज्याचे (vegetable) भाव चांगलेच गगनाला भिडले आहेत. वाढलेल्या भाज्यांच्या भावामुळे सर्वसामान्य लोकांना चांगलाच फटका बसत आहे. पालेभाज्यापासून ते फळभाज्यापर्यंत सर्व भाज्यांच्या दरामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. चवळीचा दर 320 रुपयांवर गेला आहे. तर टोमॅटो (tomato) 80 रुपये किलो झालेत. त्याचबरोबर बटाटे, कांदा, लसून, फ्लॉवर, भेंडी, पालक या सर्व भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतवृष्टीमुळे शेतकऱ्याचा भाजीपाला शेतातच खराब झाला त्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाल्याची कमतरता भासू लागली. या सर्व गोष्टींमुळे पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचं पहायला मिळत आहे. नागपुरात भाज्यांच्या दरात जवळपास दुपटीनेच वाढ झाली आहे. अनेक भाज्यांच्या भावाने शंभरी पार केली आहे.
दरम्यान, महागाईचा प्रश्न हा फक्त भाज्यांच्या भावापूरताच मर्यादीत नाही तर धान्यांच्या किमतींमध्ये देखीलमोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर सीएनजी, पीएनजी आणि घरगुती स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर एलपीजीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.