
Dowry Case । लग्न ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाची असते. लग्नाबाबत त्याचबरोबर आपल्या जोडीदाराबाबत खूप स्वप्ने पाहिली जातात. मात्र बऱ्याचदा ही स्वप्ने विखुरतात. सध्या देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवविवाहित महिलेने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तिचा नवरा नपुंसक असल्याचे आरोप महिलेने केले आहेत. आजार लपवून लग्न केले. यानंतरही सासरचे लोक तिला हुंड्यासाठी मारहाण करून अत्याचार करत असंल्याचे नवविवाहित महिलेने म्हंटले आहे. (Dowry Case)
तिंदवारी येथील एका 31 वर्षीय तरुणीचे सहा महिन्यांपूर्वी हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात लग्न झाले होते. नवविवाहित महिला तीन महिन्यांपासून तिच्या माहेरी राहत होती. पतीसह सासरचे लोक हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार तिने तिंदवारी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तिला मारहाण केली. लग्नाच्या वेळी नवरा नपुंसक होता हे वास्तव दडले होते.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. शनिवारी पोलिसांनी आरोपी पतीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. येथे, पाच सदस्यांच्या पॅनेलमध्ये डॉ. विनीत सचान, डॉ. हदेश पटेल, डॉ. हरदयाल, डॉ. अंकित आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ रामलखन चौरसिया यांनी पतीचे वीर्य आणि मानसिक स्थिती तपासली.
तिंदवारी पोलिस ठाण्याचे प्रभारी कौशल सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या अंतर्गत पतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपासाच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाईल.