Dr. Narendra Dabholkar : डॉ. दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्ष पूर्ण, वाचा नेमक काय घडल होत?

Dr. It's been nine years since Dabholkar's murder, read what exactly happened?

पुणे : पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr.Narendra Dabholkar) ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान आज दाभोलकर यांच्या हत्येला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन गटांकडून वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. अविनाश पाटील यांच्या गटाकडून सकाळी 7 वाजता दाभोलकरांची जिथे हत्या करण्यात आली तिथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत निर्भया वॉकचे आयोजन करण्यात आलंय असून नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात त्याचा समारोप होर्इल. त्यानंतर नऊ वाजता या सभागृहात विवेक निर्धार मेळावा होणार आहे.

कट्टरतावादी लोकांना विरोध केल्यामुळेच डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा एकमेकांशी संबंध असून या सर्वांच्या हत्या एका कटाचा भाग आहेत असा दावा केंद्रीय तपासयंत्रणेनं केला आहे.

नरेंद्र दाभोलकरांची हत्या कशी झाली

२० ऑगस्ट २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या झाली त्यावेळी शिंदे पुलावर सफाई करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते.यावेळी त्यांनी पाहिलं की डॉ. नरेंद्र दाभोलकर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. आणि ते दोघेही तेथून पळून गेले.डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीळ एस.आर.नावंदर यांच्या समोर सुरु आहे. या हत्या प्रकरणांमधील 5 आरोपींविरोधात आरोप निश्चिती झाला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *