
Dr. Kailas Rathi । सध्या नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका तरुणाने हॉस्पिटलच्या डॉक्टरवर एकामागून एक 18 वेळा कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत डॉक्टर गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Nashik News)
Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! गटातील आमदारावर गुन्हा दाखल
डॉ.कैलास राठी असे जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. हे नाशिकच्या पंचवटी येथील सुयोग हॉस्पिटलचे संचालक आहेत. 24 फेब्रुवारीच्या रात्री डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलच्या बेडवर बसले होते. यादरम्यान एक अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आला. आरोपी तरुण अगदी डॉक्टरच्या जवळ उभा होता. डॉक्टर सोफ्यावर बसून कोणाशी तरी बोलत होते. दरम्यान, आरोपी तरुणाने डॉक्टरच्या डोक्यावर वार केले आणि यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले.
या हल्ल्यात डॉक्टर रक्तबंबाळ झाले यांनतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. ही संपूर्ण घटना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुन्हा करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. डॉक्टरांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.