Dr. Manmohan Singh । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा

Dr. Manmohan Singh

Dr. Manmohan Singh । भारताचे माजी पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या 92 व्या वर्षी गुरूवारी रात्री निधन झाले. डॉ. मनमोहन सिंह हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1990 च्या दशकात आर्थिक सुधारणांची मोठी शरुवात केली आणि भारताला जागतिक स्तरावर एक महत्वाची आर्थिक शक्ती बनवले.

Sharad Pawar । मोठी बातमी! निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार घेणार मोठा निर्णय

शैक्षणिक दृष्टिकोन आणि जनसामान्यांसाठी असलेल्या उपलब्धतेमुळे ते नेहमीच चर्चेचा विषय राहिले. त्यांच्या शांत स्वभाव आणि विनम्रतेमुळे ते सर्वांनाच आदरणीय होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर संपूर्ण देशात शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय सरकारने त्यांच्या निधनानंतर देशभर 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Pune Accident । पुण्यात मद्यधुंद कार चालकाचा विचित्र अपघात, ९ वाहनांना धडक; एक गंभीर जखमी

आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिग्गज राजकारणी आणि नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे कार्य आणि योगदान भारतीय राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत कायम स्मरणात राहील.

Rain Update । सावधान, महाराष्ट्रावर मोठे संकट! या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता!

डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते, पण काही ठिकाणी त्यांनी केलेली शेरोशायरीतून उत्तरं आणि वक्तव्यं कायम चर्चेत राहिली आहेत. त्यांचा शांत आणि समंजस दृष्टिकोन भारतीय राजकारणात आदर्श ठरला.

Spread the love