Rakhi Sawant | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने केली टोमॅटोची लागवड, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

'Drama Queen' Rakhi Sawant planted tomatoes, fans were also shocked

Rakhi Sawant | बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ (Bollywood drama queen) म्हणजेच राखी सावंतची (Rakhi Sawant) बेधडक वक्तव्यांसाठी ओळख आहे. ती सतत सोशल मीडियावर (Social media) कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. खरतर राखीचे मूळ नाव हे नीरू भेडा असे आहे. परंतु तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत (Bollywood industry) पाऊल टाकल्यानंतर स्वतःच नाव बदलून राखी सावंत असे ठेवले. सध्या तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral video) होत आहे. (Latest Marathi News)

या व्हायरल व्हिडिओमध्ये ती टोमॅटोचे रोप लावताना (Rakhi Sawant Planted Tomato Tree) दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, मित्रांनो, मी टोमॅटोचं झाड लावत आहे. त्यावर तिच्या समोर असलेला पापराझी म्हणतो की, किती दिवसांत टोमॅटो येतील?” त्यावर राखीचा माळी म्हणतो, 15 दिवसांत झाडाला टोमॅटो येतील. राखीही खुश होऊन माझ्या झाडाला टोमॅटो येतील असे म्हणते. तिचा हा व्हिडिओ विरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (Rakhi Sawant Viral Video)

Petrol Diesel Price । पेट्रोल आणि डिझेलचे दर झाले कमी! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. काही नेटकऱ्यांनी प्रसिद्धीसाठी राखी शेती करत आहे, 15 दिवसांत टोमॅटोचे दर कमी होतील, तर काही जण असे म्हणत आहेत की लोकप्रियतेसाठी काय करावं लागतं ड्रामा क्वीनला, आधी कृषीविषयक अभ्यास कर मग शेती कर अशा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पुण्यात कोयता गॅंगने माजवली पुन्हा एकदा दहशद, व्यापाऱ्यावर केला कोयत्याने हल्ला; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

दरम्यान विरल भयानीने तिचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून ती यामध्ये असे म्हणत आहे की, “मी क्रांतीकारी नाही. टोमॅटोकारी आहे. आज मी माझ्यासाठी टोमॅटोचं झाड लावले आहे. याला येत्या 15 दिवसांत टोमॅटो येणार आहेत. या झाडाला येणारे टोमॅटो आता मी पुढील सात जन्म खाणार आहे”.

बंडानंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार दिसणार एकाच मंचावर, कधी आणि कुठे जाणून घ्या

दरम्यान राखीलाच ‘कॉन्ट्रोवर्सी क्वीन’ असेही म्हणण्यात येते. कारण तिला जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वतःच मत मांडायचे असते. परंतु तिची मत अनेकांना खटकल्याने वाद होतात. सध्या देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जास्त पैसे देऊन टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत. यावरही तिने नाराजी व्यक्त केली असून तिने शेती करणार असल्याचे सांगितले होते.

Royal Enfield । 30 वर्षांपूर्वीची रॉयल एनफिल्ड बुलेटची किंमत जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का, जाणून घ्या यामागची रंजक कहाणी

Spread the love