Dress Code । शालेय शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय! विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही आता ड्रेस कोड लागू

Dress Code

Dress Code । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शालेय शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू होणार असून शाळांमध्ये जसा विद्यार्थ्यांना गणवेश असतो तसाच आता शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू होणार आहे. सर्व शाळांच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा आहे. (Dress Code for Teacher)

Fire News । कपड्याच्या दुकानाला भीषण आग! लाखो रुपयांचं झालं नुकसान

राज्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी याबाबत घोषणा केली आहे. सर्व शिक्षकांनी एकाच रंगाचा ड्रेसकोड वापरावा. शिक्षकांनी शाळेत जीन्स, टी-शर्ट वापरू नये अशा सूचना दिल्या आहेत. हा निर्णय लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनासारखे कोणतेही कपडे घालता येणार नाही. दरम्यान, शिक्षकांच्या कपड्याचा रंग कुठला असावा याबाबत शाळा निर्णय घेणार आहे. (Latest marathi news)

Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का! बड्या नेत्याने फडकावलं बंडाचं निशाण

Ads

सर्व शिक्षकांना व्यवस्थापनाने नेमून दिलेले कपडे घालावे लागणार आहेत. या नियमाप्रमाणे महिला शिक्षकांसाठी साडी किंवा सलवार-चुडीदार, कुर्ता,दुपट्टा असा पेहराव असावा. इतकेच नाही तर सर्व शिक्षकांना आता त्यांच्या नावापुढे टीआर म्हणजे शिक्षक अशी पदवी लावता येणार आहे. यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Crime News । जुन्या वादातून नागपूरमध्ये खळबळ! गोळीबारासह लाठ्याकाठ्यांनी केली जोरदार हाणामारी, एकाची प्रकृती गंभीर

Spread the love