तरुणांनो मनसोक्त दारु प्या! ‘या’ सरकारचे आगळेवेगळे आवाहन; वाचा सविस्तर

Drink to your heart's content, young men! Different appeals of 'this' government; Read in detail

आपण पहिल्यापासून ऐकत आलोय की दारु (alcohol) ही शरीरासाठी अत्यंत घातक असते. बऱ्याच ठिकाणी तर दारु बंदीसाठी (liquor ban) आंदोलने होतात. दरम्यान अशी अनेक जिल्हे आहेत जिथे संपूर्ण दारुबंदी करण्यात आली आहे. पण दुसर अस एक ठिकाण असे आहे की, जिथे चक्क सरकारची (Government) नागरिकांना मनसोक्त दारु पिण्यास परवानगी देत आहे. या ठिकाणी दारुला अमृताचा दर्जा मिळाला आहे.

Ketaki Chitale: “10 वर्षांनंतर मला तुरुंगात…” पुन्हा एकदा केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

जपान सरकारने (Japan Government) तरुणांना बिनधास्त दारु पिण्याचे (Alcohol) आवाहन केले आहे. विशेष म्हणजे जपानी सरकारने तरुणांसाठी खास Sake Viva कॅम्पेनही राबविले आहे. खासकरुन 20 ते 39 या वयोगटातील तरुणांना दारु पिण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. हे सर्व ऐकून तुम्हालाही धक्काच बसला असेल की जपान सरकार तरुणांनी दारू प्यावी म्हणून येवढं खटाटोप का करत आहे.

नेहाची पुन्हा एन्ट्री होणार? ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहाचा नवा लूक चर्चेत

जपान सरकार दारुची विक्री वाढवण्यावर भर देत आहे. कारण त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या रुपातून मोठी रक्कम जमा होईल. जास्तीत जास्त कर जमा व्हावा यासाठी जपान सरकार जास्तीत जास्त दारु पिण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल असा सरकारचा प्रयत्न आहे. जपानच्या नॅशनल टॅक्स एजेंसीने महसूलही तोटा कमी करण्यासाठी दारु पिण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे.

मित्राच्या वाढदिवसानिमित्त फिरायला जाणे पडले महागात, धबधब्याच्या पाण्यात बुडून चार मित्रांचा मृत्यू

त्यामुळे जपानची अर्थव्यवस्था मजबूत होईल असा सरकारचा दावा आहे. मागील वर्षी म्हणजे कोरोना काळात जपानमध्ये नागरिकांनी दारु पिणे कमी केले होते. इतकंच नाही तर ज्या नागरिकांचे वय जास्त आहे, त्यांनी तर दारु सोडूनच दिली होती. दारू पिणे सोडल्याने सरकारच्या तिजोरीत कर रुपाने मिळणारी रक्कम कमी झाली.म्हणून जपान सरकार आता तरुणांना दारू पिण्याचा सल्ला देत आहे.

खडकी येथील श्री गणेश सहकारी संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना साखर वाटप

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *