Sharad Pawar । कोल्हापूर : यंदा राज्यात उशिरा पावसाने (Rain) हजेरी लावली. त्यात राज्याच्या काही भागात पावसाने अजूनही तोंड दाखवले नाही. पावसाने पाठ (Rain in Maharashtra) फिरवल्याने या भागात पेरण्या झाल्या नाहीत. तर काही भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. (Latest Marathi News)
दुष्काळावर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारला (State Govt) काही सूचना केल्या आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. बोलताना ते म्हणाले की, “संकटाच्या परिस्थितीत लोकांना कामं दिले पाहिजे. पशूधन वाचवण्यासाठी त्यांना चारा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना गायी, म्हशी पुरवाव्या. त्यांना पिण्यास पाणी पुरवावे. माणगाव, खटावसह इतर जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढवावी, असा सल्ला पवार यांनी दिला आहे.
Government Scheme । शेतकरी बनणार उद्योजक! सरकार देत आहे 50 लाख रुपये, असा घ्या लाभ
पुढे ते म्हणाले की, “शेतकरी आणि कष्टकऱ्यांकडून वसुली करू नये. त्यांना कर्जमाफी द्यावी. कर्जाचे दीर्घ हप्ते करावे, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. ज्यावेळी संकटाची चाहूल लागते त्यावेळी अशी तयारी करावी, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. परंतु आता राज्य सरकार दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Onion Rate । कांदा निर्यातीवरून शेतकरी संघटना आक्रमक! चक्काजाम आंदोलन करत केली ‘ही’ मागणी