“तरुण दारूच्या नशेत थेट आगीत पडला अन्…”, पाहा थरकाप उडवणारा Video

"Drunken youth fell directly into the fire and...", watch the shocking video

दारू (alcohol) पिल्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. कुटुंबातील कुटुंबप्रमुख दारू पिऊन गोंधळ घालतात त्याचबरोबर दारू पिऊन अशा लोकांचे अपघात होण्याचे देखील प्रमाण वाढत चालले आहे. कुटुंबातील एक व्यक्ती दारू पिल्यामुळे संपूर्ण कुटूंबावर उपासमारीची वेळ येत आहे. दारू पिल्यानंतर तरुणांना नशेमध्ये काही सुचत नाही. यामुळे अनेक धक्कदायक घटनांना सामोरे जावे लागते.

रोहित शर्माची संपत्ती वाचून तुमचेही फिरतील डोळे! महिन्याला कमावतो ऐवढे कोटी…

सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या देखील अंगावर काटा येईल. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुण शेकोटी करून बसले आहेत. अशावेळी त्यातील एक तरुण दारूच्या नशेत काहीतरी बडबडतो आणि थेट त्या शेकोटीमध्ये पडतो. त्यानंतर लगेच त्याचा मित्र त्याला बाजूला काढतो यावेळी सुदैवाने त्याला कोणतिही मोठी दुखापत होत नाही.

भर कार्यक्रमात गौतमी पाटीलला गडी भिडला; व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ himalayanrootz या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

धक्कादायक घटना! तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यु; 15 दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *