Tomato Rate । टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; थेट बाजारसमितीमध्येच टोमॅटो दिले फेकून

Due to the collapse of tomato prices, the farmer took an extreme decision; Tomatoes were given and thrown directly in the market committee itself

Tomato Rate । टोमॅटो (Tomato) हे असे पीक आहे ज्याला बाजारभाव मिळो अथवा न मिळो, प्रत्येक वर्षी त्याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी देखील टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले होते. पावसामुळे बाजारात टोमॅटोची आवाक कमी झाली होती. त्यामुळे टोमॅटोला यंदा चांगला दर (Tomato Price) मिळाला होता. अनेक शेतकरी टोमॅटोची विक्री करून करोडपती झाले आहेत. (Latest Marathi News)

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर उधळला भंडारा, आंदोलकाला लाथा बुक्क्याने मारहाण; नेमकं काय घडलं?

टोमॅटो महाग झाल्याने सर्वसामान्यांना तो खरेदी करता येत नव्हता. परंतु आता टोमॅटोची लाली उतरली (Tomato Rate Falls Down) आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहेत. टोमॅटोला चांगले बाजारभाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. मागील दीड महिन्यापासून पाऊस लांबणीवर पडला आहे. शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर टोमॅटो जगवला आहे.

Health Tips । सावधान! चुकूनही ‘या’ वस्तू ठेवू नका फ्रीजमध्ये, द्याल कॅन्सरला आमंत्रण

त्यात टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. टोमॅटो विकून शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही मिळणे अवघड झाले आहे. सध्या टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेट्सला पन्नास ते शंभर रुपयापर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीमध्ये टोमॅटो फेकून दिला आहे.

Crime News । ब्रेकिंग! सरस्वती वैद्य हत्या प्रकरणी मोठी अपडेट, १२०० पानांचे दोषारोपत्र दाखल

टोमॅटोच्या कोसळलेल्या दरामुळे आता शेतकरी गांजाच्या शेतीला परवानगी द्या अशी संतप्त मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जर हे दर असेच कायम राहिले तर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट येऊ शकते. त्यामुळे हे दर असेच राहतात की त्यात घसरण होईल हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

Asia Cup 2023 । पावसामुळे आशिया चषकाची फायनल रद्द झाली तर विजेता कोण? काय सांगतो नियम जाणून घ्या…

Spread the love