यावर्षी राज्यात पावसाने (Rain in Maharashtra) उशिरा हजेरी लावली आहे. राज्यात जरी ठिकठिकाणी हजेरी लावली असली तरी काही ठिकाणी अजूनही पावसाने पाठ फिरवली आहे. पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर (Farmer) दुबार पेरणीची वेळ आली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करण्यात याची अशी मागणी बीआरएस (BRS) पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी केली आहे. (Latest Marathi News)
आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याची ओळख आहे. मागील महिन्यात या जिल्ह्यातील 36 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. या आठवड्यात देखील या जिल्ह्यात 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नसल्याने सरकारने दुबार पेरणीसाठी मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी यावेळी राठोड यांनी केली आहे.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली गुड न्यूज! पगारात होणार ‘इतकी’ वाढ
पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यात यावर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात अजूनही पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे काही भागातील पेरण्या रखडल्या आहेत तर काही भागातील पिके पाण्याविना जळून चालली आहेत.
अधिकारी होताच पतीला धोका देणाऱ्या ज्योती मौर्य प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, पतीने थेट केले गंभीर आरोप