Panjab Dakh । भारत हा कृषिप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. जर देशात पावसाने दांडी मारली तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. परभणी येथील रहिवासी असणारे पंजाबराव डख हवामान अभ्यासक आहेत. त्यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार पाऊस पडतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियाचा वापर करून ते हवामान अंदाज सांगत असतात.
Adipurush । ‘आदिपुरुष’ च्या या 10 मोठ्या चुका ठरत आहेत वादाचं कारण, चित्रपट पाहण्यापूर्वी एकदा पहाच
परंतु यावर्षी ते चर्चेचा विषय ठरत आहेत. यामागे कारणही वेगळे आहे. त्यांनी वर्तवण्यात आलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार यंदा राज्यात पाऊस पडला नाही. याउलट तो लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता पंजाबराव डख यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यात १० जून ते १५ जूनपर्यंत पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी केली होती. पावसाला उशीर झाल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. यावरून आता त्यांचे समर्थक आणि विरोधक सोशल मीडियावर आमने-सामने आले आहेत.
याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर शेअर करत यावर स्पष्टीकरण दिले होते. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, ‘बिपरजॉय चक्रीवादळ १६ जूनला गुजरातच्या किनाऱ्यावर धडकेल. हे वादळ बाष्प ओढून घेऊन जाणार आहे. त्यामुळे राज्यात मान्सून कमजोर होणार आहे. यापूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जमिन ओली असेल तरच शेतकऱ्यांनी पेरणी करावे, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले होते. तरीही पाऊस पडला नसल्याने मराठवाड्यातील सोशल मीडिया ग्रुपमध्ये समर्थक आणि विरोधक समोरा समोर आले आहेत.
Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; हुल्लडबाजांमुळे दहा मिनिटात कार्यक्रम पडला बंद