World Cup 2023 । सध्या वर्ल्ड कपचे (World Cup 2023) सामने सुरु आहेत. क्रिकेटप्रेमींसह संपूर्ण देशाचे या सामन्यांकडे लक्ष लागले आहे. यंदा वर्ल्ड कप ट्रॉफी कोणता संघ जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, भारतीय संघाने (Team India) दमदार सुरुवात केली आहे. तीनपैकी एकही सामना भारतीय संघाने गमावला नाही. परंतु या सामन्यादरम्यान जगातील श्रीमंत क्रिकेट मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI) आता चांगलेच चर्चेत आले आहे. (Latest Marathi News)
नुकत्याच झालेल्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या (Sri Lanka and Australia) सामन्यात पावसाने घोळ घातला होता. पावसामुळे काहीवेळ सामना थांबवण्यात आला होता. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान लखनऊच्या स्टेडियममध्ये मोठा अपघात झाला. वादळामुळे स्टेडियमच्या वरच्या भागावरील होर्डिंग स्टँडमध्ये प्रेक्षकांच्या अंगावर पडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Due to strong winds, hoardings are falling all over Lucknow's Ekana Stadium.
— Ali Taabish Nomani (@atnomani) October 16, 2023
Spectators running for safety.#CWC23 #AUSvSL #WorldCup2023 #Lucknow @BCCI @ICC pls remove these banners before the next match. pic.twitter.com/xxoqK775jK
Viral Video । भर रस्त्यात गाडीच्या छतावर बसून कपलने केला रोमान्स; व्हिडीओ व्हायरल, नागरिक म्हणाले…
हे होर्डिंग खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी बसलेल्या प्रेक्षकांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारताकडे यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद आहे. त्यामुळे बीसीसीआयने जय्यत तयारी केली आहे. परंतु, या घटनेमुळे बीसीसीआयवर टीकेचे झोड उठली असल्याची पाहायला मिळत आहे.