मुंबई : अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांचा आता एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवप्रताप गरूडझेप, असं त्यांच्या या नवीन प्रदर्शित अनार्य चित्रपटाचं नाव आहे. यामध्येच आता अमोल कोल्हेनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेऊन या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट देखील शेअर केली आहे. सध्या ही फेसबुक पोस्ट खूप चर्चेत आहे.
अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो फेसबुकवर शेअर केले. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, नुकतीच केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शहा यांची भेट घेतली व विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली. तसेच दिल्ली येथे ‘गरूडझेप’च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंतीही केली. ज्या घटनेने ३५६ वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून घेत या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली, त्या ऐतिहासिक घटनेवर शिवप्रताप गरूडझेप हा सिनेमा आधारित आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधावे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा, हाच उद्देश!
Kangana Ranaut: अभिनेत्री कंगणा रणावतची राजकारणात एन्ट्री? शनिवारी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले की, या भेटीत उत्तर व दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला संस्कार व छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला संस्कार समजावून सांगणारा ‘शिवसंस्कार सृष्टी’ प्रकल्प व सर्वसामान्यांना माफक दरात आरोग्यसेवा देणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प यासंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास मला माननीय गृहमंत्री महोदयांनी यावेळी दिला. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल माननीय गृहमंत्री महोदयांना मनःपूर्वक धन्यवाद!
Rain Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज; ‘या’ भागात ‘यलो अलर्ट’