आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जाहीर सभा होणार आहे. मागच्या दोन तीन दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला होता. यांनतर संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिलीच बैठक होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेला तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. परंतु नाना पटोले हे या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
बागेश्वर बाबांनी साईबाबांविषयी केले मोठे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “कोल्ह्याची कातडी घालून कोणी…”
माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकृती अत्यवस्थ असल्याचं कारण दिल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. मात्र नाना पटोले यांनी थेटपणे कारण सांगितलेलं नाही.
छोटू दादा झाला आचारी अन् पाच रुपयांना विकली बिर्याणी थाळी! पाहा व्हायरल Video
दरम्यान, या सभेसाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. आज होणाऱ्या सभेला उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्याबसोबत महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हे सर्व नेते एकाच मंचावरून कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाजपमध्ये प्रवेश करणार