मुंबई : काल राज्यभरात बाप्पा गणेशाला उत्साहात (ganesh visarjan) निरोप देण्यात. मागील दोन वर्षी कोरोनामुळे कोणताच सण उस्तव थाटामाटात साजरी करता आला नाही. परतू यावर्षी मुंबई (mumbai), पुण्यासह (pune) अनेक ठिकाणी जल्लोषात आणि दीर्घकाळ चालणाऱ्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.
फक्त रात्री नाहीच तर अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अनेक मोठ्या मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन उत्साहात सुरू होते. परंतु या उत्साहाला गालबोट लागल्याची घटना दिंडोशीमध्ये (dindoshi) पाहायला मिळाला आहे. दोन विरोधी पक्षाचे गट नाही तर भाजपाचेच (bjp )दोन गट आमनेसामेन आले. दरम्यान पोलिसांनी(police) येऊन हा वाद मिटवला.
‘या’ दिवशी ‘अतिवृष्टीग्रस्त’ शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पैसे जमा; मदतीसाठी जीआर निघाला
नेमकी घटना काय घडली?
दिंडोशीमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी लभाजपा आमदार राजहंस सिंह आणि भाजपा पूर्व नगरसेवक विनोद मिश्रा यांचे कार्यकर्ते एकमेकांशीच भिडले.या दोन्ही गटांमध्ये मध्यरात्रीच्या मोठा वाद सुरू झाला हे दोन्ही गट आपापसात भिडल्यामुळे आसपासच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.हा सगळा वाद गणेशोस्तवासाठी उभारलेल्या स्वागत मंचाजवळ झाला.त्यामुळे नागरिकांची गर्दी आणि वाद टाळण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद काहीसा कमी झाला.पण नेमका कोणत्या कारणावरून वाद सुरू झाला, याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळाली नाही.
सर्दी – खोकला झालाय? मग करा ‘हे’ घरगुती उपाय, मिळेल झटपट आराम