Dhananjay Munde : ईडीचा ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे यांचा घणाघात

E of ED stands for Eknath Shinde and D stands for Devendra Fadnavis, Dhananjay Munde.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी(ncp) काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान अशातच आज धनंजय मुंडे(Dhananjay munde) यांनी आज भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा(ED)भाजप सरकार दुरुपयोग करत आहे. आणि दुरुपयोग मोदी सरकार काही आज करतय आस नाही तर गेली साडेसात वर्षे झाली मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा स्वतःसाठी उपयोग करून घेत आहे.

एवढंच बोलून धनंजय मुंडे थांबले नाहीत तर ते पुढं आत्ताचे शिंदे सरकार हे ही ईडीचेच आहे.कारण इडीचा इ म्हणजे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis). हे ईडीचे सरकार म्हणजे फक्त योगायोग आहे.

याधीचा इतिहास पाहिला तर केंद्रीय तपास यंत्रणांचा म्हणजे इडीचा वापर हा फक्त देशाच्या सुरक्षेसाठी केला जायचा. पण आता चित्र मात्र वेगळं आहे कारण आजचे केंद्रातील भाजप सरकार हे स्वतःच्या खुर्च्या, स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर करत आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *