युट्युब हे आजच्या काळात मनोरंजनाचे मोठे माध्यम बनले आहे. यावर अनेक प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. युट्युब शॉट्स ( Youtube Shots) हा प्रकार देखील आजकाल चांगलाच चालतोय. अनेक कंटेंट क्रिएटर्स या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहेत. यातून त्यांना आर्थिक फायदा व प्रसिद्धी मिळते. सध्या युट्युब कंटेट क्रिएटर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
शिकण्याचं स्वप्न अधुरीच राहील..! लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थीनीची चाकूने हत्या
जर तुम्हीही युट्युबवर कंटेंट टाकत असाल तर मॉनिटायझेशनबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तुमच्या युट्युब चॅनलला फक्त 500 सब्सक्रायबर्स असतील तरी तुम्हाला पैसै मिळू शकतात. याआधी ही मर्यादा 1000 सब्सक्राइबर्सची होती. त्याचबरोबर युट्युबने वॉच हवर 4000 तासांहून 3000 तासांवर आणले आहेत. युट्युबने आज याबाबतची माहिती दिली आहे.
गौतमी पाटीलच्या आईचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; पाहा video
त्यामुळे आता ज्या लोकांचे कमी फॉलोअर्स आहे अशा क्रिएटर्स लोकांना देखील त्यांच्या YouTube चॅनेलच्या मार्फत कमाई करता येणार आहे. याआधी 1000 सब्सक्राइबर्सची आणि 4000 तासांची मर्यादा होती मात्र आता 500 सब्सक्रायबर्स आणि 3000 तासांची मर्यादा करण्यात आली आहे. हे नियम प्रथम युनायटेड किंगडम, अमेरिका, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये लागू जाणार आहेत. यानंतर ते इतर देशांमध्येही लागू केले जाऊ शकतात.
लग्नानंतर जोडपे हनिमूनला गेले मात्र त्यांच्यासोबत घडलं भयानक; वाचून अंगावर काटा येईल…
हे ही पाहा