Site icon e लोकहित | Marathi News

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे जीवितहानी; मृत्यूची संख्या नऊ हजारांवर

Earthquake casualties in Turkey and Syria; The death toll is over nine thousand

तुर्की आणि सीरियाला भूकंपाचे हादरे बसले आहेत. येथे ढिगारे उपसण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढत आहे. मागील दोन दिवसांत तुर्की व सीरियाला भूकंपाचे 435 धक्के बसले असून यामध्ये एकूण 9 हजार 400 लोकांचा बळी गेला आहे. गेल्या दशकभरातील हा सर्वात मोठा विनाशकारी भूकंप असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. (Turkey & seriya earthquack)

तब्बल दोन वर्षानंतर एम.एस.धोनीचे कमबॅक; चाहते सुद्धा झाले हैराण

नेपाळमध्ये देखील 2015 ला मोठा भूकंप झाला होता. यावेळी 8 हजार 800 लोकांचा मृत्यु झाला होता. त्या तुलनेत तुर्की आणि सीरियामध्ये जास्त जीवितहानी झाली आहे. याठिकाणी लोकांच्या मदतीसाठी साथ हजारहून अधिक बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये आतापर्यंत 8 हजार लोकांना वाचविण्याय यश आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना घरी जाऊन दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतींमधून नागरिकांना वाचवण्यासाठी विविध देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध देशांची बचाव आणि मदत पथके तुर्की व सीरियामध्ये दाखल झाली आहेत. मदत पथकांकडून लोकांना आवश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.

धक्कदायक! बाप दररोज दारू प्यायचा म्हणून बापाला कंटाळून दोघा मुलांनी जन्मदात्या बापाचीच हत्या केली

या मदतकार्यात भारताने देखील हातभार लावला आहे. भारताने तुर्की व सीरियाला सहा टन आपत्कालीन मदत साहित्य पाठवले आहे. यामध्ये रुग्ण तपासणीसाठी लागणारे पोर्टेबल ईसीजी, मशीन मॉनिटर व औषधांचा समावेश आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसबा, चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते; कायदेतज्ज्ञांनी केलं मोठं विधान

Spread the love
Exit mobile version