
Earthquake in Nepal । सध्या भूकंपाच्या धक्क्याने अनेक देश हादरत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळत आहे. आता भारताच्या शेजारी देश असलेल्या नेपाळला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. यामध्ये शेकडो इमारतींची पडझड झाली असून आतापर्यंत या घटनेत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
नेपाळच्या (Nepal) पीएमओ कार्यालयाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सध्या बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. (Earthquake in Nepal)
या भूकंपाची तीव्रता एवढी भीषण होती की, यामध्ये शेकडो इमारती जमीन दोस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये 70 जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून या घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Manoj Jarange Patil । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतले मागे