Morocco Earthquake । आफ्रिकेतील मोरोक्को मध्ये शुक्रवारी रात्री भूकंप झाला आणि या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 एवढी मोजल्या गेली. हा भूकंप महाभीषण होता. यामध्ये अनेक घरे, इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या ठिकाणचे नागरिक रात्री गाढ झोपेत होते आणि असं असतानाच भूकंप झाल्यामुळे नागरिक झोपेतच गाडले गेले आहेत. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Tulsi Plant । रविवारच्या दिवशी तुळशीची पाने का तोडू नये? जाणून घ्या यामागचं मोठं कारण
दरम्यान, या भूकंपामध्ये आतापर्यंत दोन हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणी ढिगारा हातावताच लगेचच मृतदेह सापडतोय मृतदेह सापडत नाही असं एकही ठिकाण नाही. अख्खा दिवस गेला तरी मृतदेह निघायचं थांबत नाहीत. मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. हे इतके भयानक दृश्य मोरोक्कोत झाला आहे. एखाद्या भीतीदायक भागासारखा भाग हा मोरोक्कोमध्ये दिसत आहे.
मोरोक्कोमध्ये भूकंप झाल्यानंतर त्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या भूकंपामुळे अनेक घरे, इमारती जमीनदोस्त झाल्या असून अनेकांची संसार देखील उध्वस्त झाले आहेत. यामध्ये कुणाची आई गेली, कुणाचा बाप गेला, कुणाचा मुलगा तर कुणाचे आजी आजोबा गेले या भूकंपामुळे तेथील लोकांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्या ठिकाणच्या लोकांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उदासपण आहे. लोक ढसाढसा रडत आहेत. लोकांचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत तर काहींचे तर रडून रडून अक्षरश डोळे सुजले आहेत. त्यामुळे सांत्वन करावे तरी कुणाचे? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. कारण यामध्ये प्रत्येक घरातील कोणी ना कोणी व्यक्ती या भूकंपामध्ये गाडला गेला आहे.
Sana Khan Murder । सना खान हत्याकांडप्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती!
या भूकंपामुळे देशांमध्ये तीन दिवसाचा राष्ट्रीय शोक देखील जाहीर करण्यात आला आहे. मोरोक्कोमध्ये सर्वात जास्त नुकसान हे माराकेश या ठिकाणी झाला आहे. या भागातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये मोरोक्कोतील ऐतिहासिक इमारती, मशिदी हलताना दिसत आहेत. 1960 नंतरचा सर्वात भीषण भूकंप असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भूकंपाने काही क्षणातच होत्याचं नव्हतं झाल आहे.
सगळीकडे आक्रोशच आक्रोश
भूकंप झाल्यानंतर काही सेकंदातच सगळीकडे आक्रोश आणि मातंग सुरू झाला. वाचवा वाचवा असा आवाज सगळीकडे पसरू लागला. प्रत्येकजण आपापला जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. मात्र यावेळी प्रत्येकजण हतबल होता.