Site icon e लोकहित | Marathi News

Earthquake । मोठी बातमी! अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंप; मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त; अनेकजण जखमी

Earthquake

Earthquake । सध्या अफगाणिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानसाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत दुर्दैवी ठरला आहे. एका मागोमाग एक तीन भूकंपाच्या धक्क्याने अफगाणिस्तान हादरले आहे. यामध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तरी यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.

Sharad Pawar । निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिला मोठा धक्का

सध्या या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Uddhav Thackeray । आत्ताची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली परवानगी; नेमकं कारण काय?

अफगाणिस्तान या ठिकाणी पहिला भूकंप 12.11 वाजता जाणवला त्याची तीव्रता 6.1 रिश्टर केली होती त्यानंतर 12.19 मिनिटांनी दुसरा भूकंप जाणवला त्याची तीव्रता 5.6 इतकी होती आणि त्यानंतर 12.42 मिनिटांनी तिसऱ्या भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे या भूकंपाने अफगाणिस्तान चांगलेच हादरले आहे. मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Crime News । मुलीसोबत बोलण्यास मनाई केली म्हणून दोन विद्यार्थ्यांना राग अनावर… शिक्षकावरच झाडली गोळी; व्हिडिओ केला व्हायरल

अफगाणिस्तान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामध्ये मोठी वित्तहानी झाली असून शहरातील इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भूंकपाचा केंद्रबिंदू असलेल्या हेरातमधल्या जिंदा जान जिल्ह्यातल्या तीन गावांमध्ये मृतांची संख्या जास्त असल्याची माहिती मिळत आहे.

Accident News । मोठी बातमी! माळशेज घाटात ट्रक आणि बसची भीषण धडक; २० प्रवासी गंभीर जखमी

Spread the love
Exit mobile version