Site icon e लोकहित | Marathi News

“गुटखा खा, दारू प्या,आयोडेक्स खा पण…”; भाजपा नेत्याचं वक्तव्य चर्चेत

"गुटखा खा, दारू प्या,आयोडेक्स खा पण…"; भाजपा नेत्याचं वक्तव्य चर्चेत

भाजपच्या एका खासदाराने सध्या एक वेगळंच विधान केलं आहे त्यामुळे सध्या त्यांचे विधान चर्चेचा विषय बनले आहे. जलसंवर्धन संदर्भात रीवामध्ये एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी एक अजबच वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तरुणांसाठी आनंददायक बातमी! राज्यात 18 हजारांपेक्षा जास्त पोलीस पदांची भरती; असा करा अर्ज

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजप नेते जनार्दन मिश्रा म्हणत आहेत की, “नदी, नाले आणि तलाव आटत आहेत. पाण्याची पातळी दरवर्षी कमी होत आहे त्यामुळे आपल्याला पाणी वाचवायचं आहे. जेव्हा पैसा खर्च होणार, तेव्हाच पाणी वाचणार. यामुळे तुम्हाला वाटेल ते करा पण पाण्याची बचत करा.”

कांद्याच्या दरात घसरण; शेतकऱ्यांना मोठा फटका

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, “गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या किंवा आयोडेक्स खा. पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या, आणि पाण्याची बचत करा”, त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दारूच्या नशेत चार मुलींनी मिळून एका मुलीला केली बेदम मारहाण; पाहा VIDEO

Spread the love
Exit mobile version