मुंबई : राज्यात सध्या ईडीसत्र सुरू आहे. एक झालं की एक राजकीय नेता या ईडीच्या जाळ्यात अडकत आहे.मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख, नवाब मलिक आणि खासदार संजय राऊत ईडीच्या अटकेत आहेत. दरम्यान अशातच बीड जिल्ह्यातील कडा येथे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात आमदार निलेश लंके बोलत होते.लंके यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणाविषयी यांनी भाष्य केले आहे. “ज्याचं बँकेत अकाउंट नाही त्याच्यामागे देखील ईडी लागते” असा घणाघात लंके (Nilesh Lanke) यांनी भाजप सरकारवर केला आहे
Urvashi-Rishabh: उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंतमधील वादाला फुटले तोंड, पोस्ट चर्चेत
निलेश लंके म्हणाले, पाच-सहा वर्षांपूर्वी मला ईडी कळत नव्हती.आता ज्याचं अकाउंट नाही, त्याच्यामागे देखील ईडी लागत आहे. तसेच, मी माझं खातं मात्र इलेक्शन लागल्यावर उघडले असल्याची मिश्कील प्रतिक्रियाही निलेश लंके यांनी दिली. लंके यांच्या या विधानाने कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये हशा पिकला.
Twin Tower: जमीनदोस्त झालं नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स, लगतच्या परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण
दरम्यान भाजप नेते मोहित कंबोज यांनी मागील काही दिवसात राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार असल्याचे भाष्य केले होते. पुढे कंबोज यांनी बारामती अग्रोचा अभ्यास सुरू केला असल्याचं देखील वक्तव्य केले होते. आण अशातच काल रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती समजत आहे.
Sanjay Rathod: मोठी बातमी! संजय राठोडांना कोरोनाची लागण, घरातच औषधोपचार सुरू