Sanjay Raut : तुरुंगात असताना लेख लिहिल्या प्रकरणी ईडीचे अधिकारी करणार संजय राऊतांची चौकशी!

ED officials will investigate Sanjay Raut in the case of writing an article while in jail!

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून रविवारी संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ‘रोखठोक’ या सदरात लेख प्रकाशीत झाला. पण संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणी ईडी च्या कोठडीमध्ये आहेत. कोठडीत असून देखील लेख लिहिता येतो का? मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. याच पार्शवभूमीवर ईडी अधिकारी संजय राऊतांची चौकशी करणार आहेत.

माहितीनुसार, तुरुंगात कोणी लेख लिहू शकत नाही. त्यासाठी न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. जोपर्यंत न्यायालयाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत असा लेख लिहिता येत नाही. त्यामुळेच आता ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे. रविवारी प्रकाशित झालेल्या ‘रोखठोक’मध्ये संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली होती.

रोखठोकमध्ये काय म्हणाले होते संजय राऊत?

“राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे”. असे राऊत म्हणाले.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

संदीप देशपांडे (Sandip Deshpande) ट्विट करत म्हणाले, “आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *