Site icon e लोकहित | Marathi News

Sameer Wankhede । पुन्हा वाढल्या समीर वानखेडेंच्या अडचणी! मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने केला गुन्हा दाखल

Sameer Wankhede

Sameer Wankhede । बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ऑक्टोबर २०२१ रोजी अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केल्यापासून समीर वानखेडे सतत चर्चेत येत आहेत. आर्यन खानला अटक केल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. अशातच आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. (Latest marathi news)

Nikhil Wagle । घडीची सर्वात मोठी बातमी! निखील वागळेंसह 200 जणांवर गुन्हे दाखल, नेमकं कारण काय?

समीर वानखेडे यांच्यावर कार्डेलिया क्रूझ (Cardelia Cruz) प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप यापूर्वी झाला आहे. इतकेच नाही तर त्यांच्यावर मागील वर्षी मे महिन्यात सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. त्याआधारे ईडीने (ED) आपला गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

Chhagan Bhujbal । सर्वात मोठी बातमी! अज्ञात व्यक्तीने दिली छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, समीर वानखेडे यांची सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी याआधीच चौकशी केली आहे. पण समीर वानखेडे यांनी सीबीआयचे आरोप फेटाळून लावले होते. काही एनसीबी अधिकाऱ्यांकडून आपल्यावर खोटा आळ टाकला जात आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला. ईडीने वानखेडे यांच्याविरोधात PMLA कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Accident news । समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी

Spread the love
Exit mobile version