Rohit Pawar । छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रोहित पवार यांच्यावर ईडी (ED) मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरु होती. (Latest marathi news)
ईडीकडून आता शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना (Kannada Cooperative Sugar Factory) जप्त करण्यात आला आहे. या कारखान्याची किंमत 50 कोटी 20 लाख रुपये आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणी सर्वात अगोदर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रोहित पवार यांची 3 दिवस कसून चौकशी झाली होती.
Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांचा राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप
अशातच आता सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करत असताना शिखर बँकेने चुकीची प्रक्रिया राबवली होती, असं ईडीने म्हटलं होतं. त्यानंतर आता ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे.