ED Team Attacked In West Bengal । सध्या पश्चिम बंगालमधून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पथक छापा टाकण्यासाठी उत्तर 24 परगणा या ठिकाणी पोहोचले होते. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आणि टीमवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. (ED Team Attacked In West Bengal)
Gautami Patil । ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच गौतमी पाटीलवर भडकले लोकं
माहितीनुसार, रेशन घोटाळा प्रकरणांमध्ये तपास यंत्रणेचे पथक शुक्रवारी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखली गावात पोहोचले होते. यावेळी ईडीचे पथक टीएमसी नेते शहाजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आले होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारी देखील उपस्थित होते. मात्र यावेळी गावातील गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामस्थांनी ईडी आणि सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोड केली. तेथील गावकऱ्यांनी ईडीच्या सहाय्यक संचालकांची गाडीही सोडली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ईडी टीमवरील हल्ल्याचा निषेध केला असून पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे म्हटले आहे.