मागील काही दिवसांत राज्यातील थंडीचे ( Cold In Maharashtra) प्रमाण वाढले आहे. या कडक्याच्या थंडीचा परिणाम नागरिकांवर व पिकांवर होत आहे. यामुळे वेगवेगळे आजार देखील होत आहेत. अशातच दुभत्या जनावरांना देखील या थंडीमुळे त्रास होत आहे. या प्रचंड थंडीमुळे दुभत्या जनावरांच्या दूध उत्पन्नात ( Milk Production) घट होण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
खरंतर जनावरांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण घटले की त्याचा परिणाम त्यांच्या दुधावर होतो. हिवाळ्यापूर्वी जनावरे नऊ ते दहा लिटर दूध देत होती. परंतु सध्या अचानक तापमान कमी झाल्याने चार ते पाच लिटर दूध देऊ लागली आहेत. ही चिंतेची बाब आहे.
बारामती माळेगाव कारखान्याचा निर्णय उच्च न्यायालयाने फेटाळला; वाचा सविस्तर
यामुळे पशुपालकांनी जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच लंम्पी या रोगाच्या पार्श्वभूमीवर आणखी आजारांचा प्रादुर्भाव जनावरांना होऊ नये यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे.
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
थंडीच्या दिवसांत जनावरांची काळजी घेताना रात्रीच्या वेळी जनावरांच्या अंगावर गोणपाट टाकावे, त्यांना ऊब निर्माण व्हावी म्हणून शेकोटी पेटवावी. तसेच जनावरांना थंडी लागू नये म्हणून शेडमध्ये बांधलेल्या ठिकाणी उघडी असलेली बाजू कापडाने झाकून घ्यावी.