सातारा जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीवर लम्पी रोगाचा परिणाम, बैलांच्या बाजार आणि प्रदर्शनाला बंदी

Effect of lumpy disease on bullock cart race in Satara district, ban on bullock markets and exhibitions

सातारा: राज्यात जनावरांमधील लम्पी रोगाने (Lumpy disease) थैमान घातले असून अनेक जनावरे दगावली देखील आहेत. इतकंच नाही तर हा रोग मोठ्या प्रमाणात पशुधनामध्ये फैलावत चालला आहे. त्यामुळे प्रशासन (Administration) अलर्ट झाले आहे. दरम्यान सातारा (Satara) जिल्ह्यातील जनावरांच्या शर्यती (Animal races), बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. परंतु बैलगाडा प्रेमी (Bullock cart lovers) अटी शर्तीच्या आधारे शर्यतींना परवानगी द्यावी, अशी मागणी करत आहेत.

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांचा पीएफआयच्या समर्थकांना इशारा,”…पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही”

सातारा जिल्ह्यातील जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी चर्मरोगावरील नियंत्रणासाठी जनावरांच्या वाहतुकीवर मनाई आदेश लागू केला आहे. तसेच प्राण्यांच्या शर्यतीवरती देखील बंदी घातली आहे. कारण सातारा जिल्ह्याबरोबरच जवळच्या जिल्ह्यांमध्येही लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत.

Narendra Modi: धक्कादायक! पिएफआयच्या निशाण्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी; ईडीने केला दावा

दरम्यान या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, पोलीस अधीक्षक, सहकारी संस्था व सर्व आनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बैलगाडा प्रेमींनी सातारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये बैलगाडा शर्यत भरवण्यात यावे या मागणीचा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे दिला होता. परंतु या प्रस्तावावर प्रांत अधिकारी यांनी आदेश प्राप्त होण्याच्या आधी आदेश पत्र देऊन थांबवण्यात आले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत संबंधित बैलगाडा शर्यत व बैल बाजार थांबवण्याचे लेखी पत्र संबंधित बैलगाडा मालक आयोजक यांना प्रांत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Milk: आता दुधाच्या दरात होणार वाढ, ‘ही’ डेअरी घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय

बैलांना स्पर्धेमध्ये पळवणे गरजेचे

बैलगाडा प्रेमींनी लसीकरण झालेल्या बैलांना परवानगी द्या. बैलांना रोज फेरी मारणे तसेच स्पर्धेमध्ये पळवणे हे गरजेचे आहे. अन्यथा आमचे लाखो रुपयांचे बैल या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतात. यामुळे बैलांची किंमत कमी होऊ शकते. यासाठी प्रशासनाने लक्ष देऊन लसीकरण झालेल्या जनावरांना स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र करावे अशी मागणी करत आहेत.

डेंग्यू-मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून सावधान, या पाच नैसर्गिक वस्तूंमुळे होईल बचाव

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *