Maharashtra Politics । काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (Ashok Chavan Resigns) दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
अशातच आता काँग्रेसचे आणखी आठ ते दहा माजी नगरसेवक शिवसेना (Shiv Sena)-भाजपच्या (BJP) वाटेवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नगरसेवकांचा येत्या काही दिवसात भाजपप्रवेश होण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांमध्ये शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना चांगला लाभ झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
Ashok Chavan । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अशोक चव्हाण यांच्यासह ११ आमदार भाजपमध्ये जाणार?
इतकेच नाही तर त्यांना मतदारसंघाची बांधणी आणि निवडणुकीसाठी देखील निधी मिळाला आहे. त्यांची प्रलंबित कामे मंजूर झाली असून सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत आणखी आठ-दहा नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल. परंतु, याचा फटका महाविकास आघाडीला येत्या निवडणुकीत होईल.