Eknath Khadse: अधिवेशनात झालेल्या आमदाराच्या राढयावर एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Eknath Khadse gave 'this' reaction to the MLA's speech in the session

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (mansoon session)आज (24ऑगस्ट) पाचवा दिवस आहे. अधिवेशनाची गेली चार दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर टीका करण्यात गेली. दरम्यान आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राढा झाला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला पाहिले चार दिवस विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा (Declaration)दिल्या.

दरम्यान विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सत्ताधारी देखील आक्रमक झाले. आणि यावेळी सत्ताधारी आमदारांकडून लवासातील खोके सिल्वह ओक ओक्के, वाझेचे खोक्के मातोश्री ओक्के अशा घोषणा देण्यात आल्या. एकमेकांविरोधात घोषणा या धक्काबुक्कित बदलल्या.आणि आमदारांमध्ये राढा निर्माण झाला.

विधानभवन परिसरात सत्ताधारी- विरोधकांमध्ये धक्काबुक्की, कारण..

या सर्व राड्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं देखील पहायला मिळालं. यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde: पावसाळी अधिवेशनात शिंदे सरकारने घेतले शेती क्षेत्राशी संबंधित महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे.निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हाव, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *