Eknath Khadse । “तेव्हा मी भाजपात जाईल…” एकनाथ खडसे यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Eknath Khadse

Eknath Khadse । मागच्या काही दिवसापासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. यामुळे अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. दरम्यान आता या चर्चांबद्दल एकनाथ खडसे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही मेजर कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र केव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कळवेल. असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

Vasant More । ब्रेकिंग! राजीमाना देऊन काही तासात होताच वसंत मोरेंना अजित पवार गटाकडून खुली ऑफर

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर आज अखेर मौन सोडलं आहे. यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. मी लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन. पण शरद पवार यांच्या सल्ल्याने जाईन”, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

IPL 2024 । आयपीएलमध्ये 16 वर्षांत पहिल्यांदाच असं काही घडलं की….

“मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटलो नाही असं देखील नाही..भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि आमच्या गाठीभेटी या होत असतात. असं देखील एकनाथ खडसे म्हणाले आहेत. माझी मनापासून भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही मात्र ज्यावेळी माझी इच्छा होईल तेव्हा मी शरद पवारांना कळवेल, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं.

Vasant More । मनसेची साथ सोडताना माध्यमांसमोर ढसाढसा रडले वसंत मोरे; नेमकं काय घडलं?

Spread the love