मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या भीतीमुळे मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळ विस्तार लांबवावा लागला, अशी टीका जळगावातील राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) केली आहे. मंत्रीमंडळ विस्तार होऊन देखील अजून पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत यावरून खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधलाय.
Mumbai: मुंबईत मनसेच्या नेत्यांकडून वृध्द महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
“राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकत सद्बुद्धी गणरायाने द्यावी”, असे साकडे एकनाथ खडसे यांनी गणपतीला घातले आहे. राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गोरगरीब जनता त्रस्त आहे. त्याची वेदना आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पालकमंत्री नेमून गावागावांपर्यंत बैठका घेऊन सरकार सक्रिय व्हावे, असे साकडे एकनाथ खडसे यांनी बाप्पाला घातले आहे.
Prashant Bamb: “…ते आमच्या पिढ्या बरबाद व्हायला कारणीभूत”, आमदार प्रशांत बंब यांचे वादग्रस्त वक्तव्य
कदाचित सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची भीती वाटत असावी यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार व पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लांबवल्या असाव्यात, असा टोलाही एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.