Eknath Shinde । आताची सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या 5 सर्वात मोठ्या घोषणा

Eknath Shinde । आताची सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या 5 सर्वात मोठ्या घोषणा

Eknath Shinde । जालनामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारामुळे राज्यात चांगलाच गदारोळ झालेला पाहायला मिळतोय. आज या लाठीमाराचा तिसरा दिवस असून राज्यात अजूनही याचे पडसाद उमटत आहेत. या घटनेवरून विरोधकांनी सत्याधारांना चांगलंच घेरलं आहे. त्याचबरोबर राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाच्या पाच घोषणा केल्या आहेत.

Agriculture news । पावसाने पाठ फिरवल्याने नर्सरी चालकांचे लाखोंचे नुकसान, रोपांचा खर्चही निघेना

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी महत्त्वाच्या पाच घोषणा केल्या आहेत. आंदोलकांवर लाठी मार केल्याप्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला रजेवर पाठवण्यात आल आहे. त्याचबरोबर डीवायएसपीला जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना हे उद्या जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची जर वेळ पडली तर न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. इत्यादी मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.

Pune Crime । धक्कादायक! अल्पवयीन मुलांनी केली तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कारण…

त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची घोषणा देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

Agri News । करोडपती व्हायचे असेल तर आजच करा ‘या’ जातीच्या शेळ्यांचे पालन, अशी करा सुरुवात

Spread the love