Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ

Eknath Shinde

Eknath Shinde । राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय गोटात चुरस वाढली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखेनंतर विविध पक्षांमध्ये नेत्यांच्या पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Ajit Pawar । पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात गाडीतुन 5 कोटी रुपये जप्त, अजित पवारांनी केला मोठा खुलासा; म्हणाले…

रविवारी भाजपने आपल्या पहिल्या उमेदवार यादीत ठाणे जिल्ह्यातील आमदार किसन कथोरे यांचे नाव जाहीर केले होते. यामुळे सुभाष पवार यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यात अडचणी येणार असल्याची चर्चा होती. सुभाष पवार यांनी निवडणूक लढविण्याचा स्पष्ट इरादा व्यक्त केला होता, त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची शक्यता वाढली होती. सोमवारी, शरद पवार यांच्यासमवेत जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि गोटिराम पवार यांच्या उपस्थितीत सुभाष पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Politics News । राजकीय घडामोडींना वेग! रात्री अचानक पंकजा मुंडे अजितदादांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर; नेमकं काय घडलं?

या प्रवेशामुळे ठाण्यातील भाजप आमदार किसन कथोरे यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सुभाष पवार यांच्या निवडणुकीतील सामर्थ्यामुळे मतदारांमध्ये प्रतिस्पर्धी वातावरण निर्माण होणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुभाष पवार यांना उमेदवारी दिली गेली आहे, ज्यामुळे या निवडणुकीत जोरदार संघर्ष होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Pune News | सर्वात मोठी बातमी! पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त

Spread the love