Eknath Shinde । उल्हासनगर (Ulhasnagar) या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्येच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्र देखील हादरून गेला आहे. आता या सगळ्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.
Actor Sridevi News । श्रीदेवी मृत्यू प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती
सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करा अशी मागणी देखील आजच्या सामनातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये गुंडांचे राज्य असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची चौकशी करा आणि त्यांना अटक करा असं संजय राऊतांनी सामनात म्हटलं आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.