Eknath Shinde । कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) साथ सोडून भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केलीय. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला अजूनही सामोरे जावे लागत आहे. आपण महाविकास आघाडी का सोडली? या प्रश्नाचं उत्तर आता कोल्हापूरमधील शिवसेनेच्या महाअधिवेशनामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. (Latest maarthi news)
Suhani Bhatnagar Death । मनोरंजनविश्वावर शोककळा! दंगल फेम अभिनेत्रीचं निधन, धक्कादायक कारण आलं समोर
“महाविकास आघाडीमध्ये असताना बाळासाहेबांचे विचार मरु लागले होते. तिथे शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. नेतृत्व चुकत असल्याचे आमच्या लक्षात आले होते. त्यामुळे बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी आम्ही हे महत्त्वाचे पाऊल उचलले. समजा आमचे पाऊल जर चुकले असते तर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष जनतेने केला नसता,” असाही दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)
“तुमच्याकडे हिंदुत्व सांगण्याची नैतिकता नाही. तुमच्याकडे असेपर्यंत तो व्यक्ती चांगला असतो. परंतु गेल्यावर तो कचरा होतो. तो गद्दर होतो. आता एकेदिवशी हा महाराष्ट्र तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे”, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे.
Sharad Pawar । अजितदादांच्या ‘त्या’ आवाहनावर शरद पवारांचं आव्हान; म्हणाले, “बारामतीतून कोणीही..”