Eknath Shinde । सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काही होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते नागेश वनकळसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar । धक्कादायक बातमी! अजित पवार गटाच्या तालुकध्यक्षांचा अज्ञातांच्या हल्ल्यात मृत्यू
या भेटीद्वारे त्यांनी मोहोळ विधानसभा साठी उमेदवारीची मागणी केली आहे. नागेश वनकळसे हे शिवसेनेच्या सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या हालचालींमुळे शिवसेनेतील अस्थिरतेचा आणि पक्ष बदलाचा चर्चेला उधाण आले आहे.
त्याचबरोबर, शरद पवार हे विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सज्ज आहेत. आज ते मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत आणि यासाठी त्यांनी पुण्यात तीन दिवस तळ ठोकला आहे. १० तारखेपर्यंत या चर्चांचे आयोजन केले जाणार आहे. नागेश वनकळसे यांनी राष्ट्रवादी गटात प्रवेश केला, शिवसेनेची ताकद आणखी कमी येऊ शकते. यामुळे पुढील काळात कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Ladki Bahin Yojana l आनंदाची बातमी! ‘लाडकी बहीण’चा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार