Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा

Eknath Shinde

Eknath Shinde । सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधव एकत्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) देखील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी पाणी ग्रहण न करण्याचा देखील निश्चय केला आहे. दरम्यान या सर्व गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar Dengue । मोठी बातमी! अजित पवार यांना डेंग्यूची लागण

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी याबाबत एक पत्र लिहून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामाचे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Manoj Jarange । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे आता सरकार येत्या काळात याबाबत काही निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Famous model । मोठी बातमी! प्रसिद्ध मॉडेलचा फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, सर्वत्र उडाली खळबळ

Spread the love