Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाने दिला राजीनामा

Eknath Shinde

Eknath Shinde । सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यभर चांगला चर्चेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सकाळी मराठा कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनांवर देखील हल्ला केला. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा बांधव चांगलेच पेटलेले पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेला अल्टिमेट देखील संपला आहे. सरकारने आरक्षणासाठी पाऊल न उचलल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

Accident News । भीषण अपघात! ट्रक आणि कारची धडक, १२ जण जागीच ठार

मराठा आरक्षणाबाबत मागण्या मान्य न केल्यामुळे आणि मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसल्यामुळे राज्यभर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी राजकीय पुढार्‍यांना गाव बंदी केली आहे तर आता दुसरीकडे राजकीय पक्षातील मराठा नेत्यांनी आरक्षणासाठी राजीनामा देण्यात सुरुवात केली आहे.

Gunaratna Sadavarte । जरांगे पाटलांना अटक करा, हीच का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या; गुणरत्न सदावर्ते कडाडले

मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील उपजिल्हाप्रमुखाचा पहिला राजीनामा पडला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाचे बीडचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकर (Parameshwara Talekar) यांनी मराठा आरक्षणावर 24 तारखेपर्यंत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे.

Gunaratna Sadavarte । प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची मोठी तोडफोड; मराठा तरुणांचा मोठा दणका

Spread the love