
Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खूप मोठा धक्का बसला आहे. याचा पक्षाला आगामी निवडणुकीत परिणाम पाहायला मिळेल. (Latest marathi news) माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याची माहिती मिळत आहे.
भाजपने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोकाटेंनी हा निर्णय घेतला आहे. कोकाटेंच्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. राजीनामा दिल्यावर माध्यमांशी संवाद साधताना कोकाटेंनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
Bjp । भाजपचा काँग्रेसला सर्वात मोठा दणका! बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश
मराठा आणि धनगर आरक्षणसंदर्भात भाजप समाजमध्ये भांडण लावत आहे, असा गंभीर आरोप संजय कोकाटे यांनी केला आहे. कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर कोकाटे पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rahul Gandhi । राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत आमदारासोबत घडलं धक्कादायक!