Site icon e लोकहित | Marathi News

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का

Eknath Shinde

Eknath Shinde । आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये देखील मोठ्या घडामोडी घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे आता धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी लढा देणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, “शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहर प्रमुख महिला आघाडी, तालुकाप्रमुख महिला आघाडी व शहापूरमधील इतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये प्रवेश होणार आहे.

Accident News । धक्कादायक! कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. संतोष शिंदे हे शहापूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष होते आणि त्यांनी मनसेत प्रवेश केल्यावर मनसेची ताकद वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना धक्का बसल्याचे देखील बोलले जात आहे.

Manoj Jarange । ‘…तर OBC आरक्षणच रद्द होईल’! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये मोठी खळबळ

Spread the love
Exit mobile version