Eknath Shinde । राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे ते नाराज झाले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे बंडाचा इशारा दिला आहे. तानाजी सावंत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मोठा बदल केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवरून धनुष्यबाणाचे चिन्ह हटवून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवला आहे. यामुळे त्यांच्या नाराजीचे संकेत दिले जात आहेत.
Eknath Shinde । मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांना एकनाथ शिंदें यांनी दिला मोठा सल्ला; म्हणाले…
तानाजी सावंत यांच्या नाराजीने महायुतीत हलचाल उडवून दिली आहे. त्यांनी पुण्याला निघण्याआधी आपले फेसबुक प्रोफाइल बदलले आणि यावर शिवसैनिक असे लिहिले. त्यांच्या या कृतीवरून अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. तानाजी सावंत यांच्या कार्यालयाने ही नाराजी नाकारली आहे आणि त्यांनी सांगितले की, ज्या दिवशी सावंत यांना या बाबतीत बोलायचं असेल, तेव्हा ते माध्यमांशी संपर्क साधतील.
Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पक्षाच्याच दोन मोठ्या नेत्यांना झटका
मंत्रिपद मिळाल्याने नाराज असलेल्या तानाजी सावंत हे हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे आणि राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Allu Arjun । ‘या’ धक्कादायक कारणामुळे अल्लू अर्जुनला अटक, वाचून व्हाल थक्क