Cabinet Decision । मुंबई : आजचा दिवस संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल (Shiv Sena MLA disqualification case) आज लागणार आहे. अनेक दिवसांपासून हा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात दिला तर कदाचित त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल. (Shiv Sena MLA disqualification)
Maratha Reservation । अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक, दिला मोठा इशारा
दरम्यान, निकालापूर्वी मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे.. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. कोणते आहेत हे निर्णय? जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर माहिती.
Yash Fan Death । ‘केजीएफ’ स्टार यशच्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू, भेटायला येताना घडली दुर्दैवी घटना
बैठकीमधील ९ महत्त्वाचे निर्णय
- जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू आणि सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्यात आली आहे.
- ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित केलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- तसेच राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्यास आणि ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी दिली आहे.
- राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात रु.५० हजारांवरून वरुन एक लाखांपर्यंत वाढ केली आहे.
- श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी दिली आहे.
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज मिळणार आहे.
Bigg Boss 17 । अखेर मुहूर्त ठरला! भाईजानने सांगितला लग्नाचा प्लॅन, म्हणाला…