Eknath Shinde । आत्ताची मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली

Eknath Shinde

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज कराड या ठिकाणी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कराडला जाणार होते. मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत काल दुपारपासून ठीक नाही, थोडा ताप आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. अशी माहिती शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. (Latest Marathi News )

Thane News । धक्कादायक! इमारतीला भीषण आग, दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी

देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आज कराड या ठिकाणी प्रतिसंगम येथे राज्यातील अनेक दिग्गज नेते, कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिक यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत. सकाळपासून खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार पृथ्वीराज चव्हाण त्याचबरोबर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी अभिवादन केले आहे.

Tunnel Accident । उत्तरकाशीमधील स्थिती अजूनही भयानक, बचाव पथके बोगद्याची भिंत हातोड्याने तोडणार, बचाव कार्यात वारंवार अडथळे आल्यानंतर मोठा निर्णय

दरम्यान, एकनाथ शिंदे देखील आज उपस्थित राहणार होते. मात्र त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते कराड या ठिकाणी येऊ शकले नाहीत असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर यावेळी बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्र राज्य देशातील प्रगतशील राज्य बनवण्याचे स्वप्न आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहे.

Ahmednagar Crime News । पारनेरमध्ये जागेच्या वादामधून अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह आईची हत्या

Spread the love