Eknath Shinde । मागील काही दिवसांपासून मनसे आणि भाजप पक्षामध्ये युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नुकतेच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीमध्ये आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.
नुकतीच एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, “राज ठाकरे आणि आमची विचारताना धारा सारखीच आहे. त्यामुळे मनसे महायुतीत समाविष्ट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. तेव्हापासूनच राज ठाकरे महायुतीत सामील होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Congress | लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला बसणार मोठा फटका! माजी खासदार करणार पक्षांतर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला दक्षिण मुंबईची जागा देऊ शकतात. या ठिकाणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाईल. आता मनसे महायुतीत एन्ट्री करणार आहे की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. सध्या राजकीय वर्तुळात महायुती आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे.
Ajit Pawar । “स्वतःच्या सख्या भावाला….”, अजित पवार गटाचे सर्वात मोठे वक्तव्य