Eknath Shinde । मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) सरकारने काढलेल्या अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर अधिवेशन घेऊन त्यात कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची असून या मागणीसाठी ते जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसले आहेत. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे मात्र त्यांची प्रकृती ढासळयाची माहिती समोर आली आहे.
Mahesh Gaikwad । गोळीबारात गंभीर झालेल्या महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
उपोषणाचा सातवा दिवस असल्याने आणि शरीरात अन्न पाणी नसल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून सरकार विरोधात रोष देखील व्यक्त केला जात आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी ९ वाजता जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत.
Maratha Reservation । ब्रेकिंग न्युज! मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सगे-सोयरे अध्यादेशाचा कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री अधिवेशन बोलवण्याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.