पंढरपूरच्या आषाढी एकादशी (Pandharpur Ashadhi Ekadashi) यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त पंढरपूर या ठिकाणी जात असतात. त्यामुळे वारकरी आणि प्रवाशांच्या सोयीचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यावर्षी राज्यभरातून पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले आहेत.
Gautami Patil । बार्शीत गुन्हा दाखल होताच गौतमी पाटीलने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मी फक्त…”
काल सह्याद्री गेस्ट हाऊस (Sahyadri Guest House) येथे झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दि. 25 जुन ते 5 जुलै या दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
काल सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत बैठक पार पडली यावेळी एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाने केलेल्या जादा बसेसच्या नियोजनाचा आढावा घेतला. या बैठकीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते. त्याचबरोबर महामंडळाचे अन्य अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते.
मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी! राज्यात ‘या’ दिवशी होणार दाखल, हवामान तज्ञांचा अंदाज